माझा वॅलेन्टाईन डे
Bye ती म्हणाली मी तिथेच उभा होतो तिच्या डोळ्यात बघत... नेहमी हसरे, fresh वाटतात... आजही तसेच वाटले पण तरीही तिची नजर वेगळी होती... की माझी?? कोणास ठाऊक ... मी विचार करत होतो, साला मिळावा काहीतरी बहाणा अन दोन मिनिटांसाठीही का होईना पण थांबवावं तिला... पण काहीच सुचलं नाही ती निघून गेली. रस्त्यावरच्या गर्दीत विरून गेली मी आणि माझी वेडी नजर तिला शोधत राहिलो ती गेली हे काळात असतांनाही तिच्याच दिशेने बघत राहिलो खूप वेळ... का कोणास ठाऊक ... पावलं पुढे सरकत नव्हती जड झाली होती कदाचित ... नेहमी असच का होतं कळत नाही तिची जाण्याची वेळ येते पण ती वेळ येऊच नाही असं वाटतं Long drive किंवा candle light dinner यातलं काहीच नको असतं डोळ्यात तिच्या फक्त बघत बसणं हवं असतं आजही मी फक्त बघत होतो बोललो काहीच नाही... का कोणास ठाऊक घरी आलो नुसता बसून राहिलो माझ्या डोळ्यांमध्ये अजून तीच होती bye म्हणणारी मला कामही भरपूर होती पण तिचं channel बंद होतच नव्हतं दर ५ सेकंदांना...