माझा वॅलेन्टाईन डे
Bye
ती म्हणाली
मी तिथेच उभा होतो
तिच्या डोळ्यात बघत...
नेहमी हसरे, fresh वाटतात...
आजही तसेच वाटले
पण तरीही तिची नजर वेगळी होती...
की माझी?? कोणास ठाऊक ...
मी विचार करत होतो,
साला मिळावा काहीतरी बहाणा
अन दोन मिनिटांसाठीही का होईना
पण थांबवावं तिला...
पण काहीच सुचलं नाही
ती निघून गेली.
रस्त्यावरच्या गर्दीत विरून गेली
मी आणि माझी वेडी नजर
तिला शोधत राहिलो ती गेली हे काळात असतांनाही
तिच्याच दिशेने बघत राहिलो
खूप वेळ...
का कोणास ठाऊक ...
पावलं पुढे सरकत नव्हती
जड झाली होती कदाचित ...
नेहमी असच का होतं कळत नाही
तिची जाण्याची वेळ येते
पण ती वेळ येऊच नाही असं वाटतं
Long drive किंवा candle light dinner
यातलं काहीच नको असतं
डोळ्यात तिच्या फक्त बघत बसणं हवं असतं
आजही मी फक्त बघत होतो
बोललो काहीच नाही... का कोणास ठाऊक
घरी आलो
नुसता बसून राहिलो
माझ्या डोळ्यांमध्ये अजून
तीच होती
bye म्हणणारी
मला कामही भरपूर होती
पण तिचं channel बंद होतच नव्हतं
दर ५ सेकंदांना मी मोबाईल बघत होतो
पण काहीच उपयोग नव्हता
काही वेळानी त्यावरचं ते wallpaper सुद्धा
irritate व्हायला लागलं
पण मी मोबाईल परत परत बघतच राहिलो.....
का कोणास ठाऊक...
असं बऱ्याचदा होतं
उदास होतं मन जेव्हा ती भेटत नाही
बराच आटापिटा करूनही
शेवटी हाती काहीच लागत नाही
मी तिची वाट बघत असतो
भेटूनही माझा जीव शांत होत नसतो
बुजुर्गांनी लिहिलेलं मग पटायला लागतं
आग का दर्या है डूब के जाना वगैरे कळायला लागतं
मीही त्या आगीत रोजच होरपळतो
पण तरीही त्यात डूबणं मी सोडत नाही
का कोणास ठाऊक.....
ती म्हणाली
मी तिथेच उभा होतो
तिच्या डोळ्यात बघत...
नेहमी हसरे, fresh वाटतात...
आजही तसेच वाटले
पण तरीही तिची नजर वेगळी होती...
की माझी?? कोणास ठाऊक ...
मी विचार करत होतो,
साला मिळावा काहीतरी बहाणा
अन दोन मिनिटांसाठीही का होईना
पण थांबवावं तिला...
पण काहीच सुचलं नाही
ती निघून गेली.
रस्त्यावरच्या गर्दीत विरून गेली
मी आणि माझी वेडी नजर
तिला शोधत राहिलो ती गेली हे काळात असतांनाही
तिच्याच दिशेने बघत राहिलो
खूप वेळ...
का कोणास ठाऊक ...
पावलं पुढे सरकत नव्हती
जड झाली होती कदाचित ...
नेहमी असच का होतं कळत नाही
तिची जाण्याची वेळ येते
पण ती वेळ येऊच नाही असं वाटतं
Long drive किंवा candle light dinner
यातलं काहीच नको असतं
डोळ्यात तिच्या फक्त बघत बसणं हवं असतं
आजही मी फक्त बघत होतो
बोललो काहीच नाही... का कोणास ठाऊक
घरी आलो
नुसता बसून राहिलो
माझ्या डोळ्यांमध्ये अजून
तीच होती
bye म्हणणारी
मला कामही भरपूर होती
पण तिचं channel बंद होतच नव्हतं
दर ५ सेकंदांना मी मोबाईल बघत होतो
पण काहीच उपयोग नव्हता
काही वेळानी त्यावरचं ते wallpaper सुद्धा
irritate व्हायला लागलं
पण मी मोबाईल परत परत बघतच राहिलो.....
का कोणास ठाऊक...
असं बऱ्याचदा होतं
उदास होतं मन जेव्हा ती भेटत नाही
बराच आटापिटा करूनही
शेवटी हाती काहीच लागत नाही
मी तिची वाट बघत असतो
भेटूनही माझा जीव शांत होत नसतो
बुजुर्गांनी लिहिलेलं मग पटायला लागतं
आग का दर्या है डूब के जाना वगैरे कळायला लागतं
मीही त्या आगीत रोजच होरपळतो
पण तरीही त्यात डूबणं मी सोडत नाही
का कोणास ठाऊक.....
bhari be...:)
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteतोडलस मित्रा....
ReplyDeleteखूप छान.......
मस्त....